









आशादीप मतिमंद मुलांचे निवास व स्वयंरोजगार केंद्र, रत्नागिरी
"तुमचा छोटासा हातभार, एका विशेष मुलाचं उज्वल भविष्य घडवतो."
सर्व सामाजिक संस्था, हितचिंतक अन् दानशूर
व्यक्तीकडून भरघोस अर्थसहाय्याची अपेक्षा आहे. जेवढी
जास्तीत जास्त मदत करता येईल तेवढी मिळावी.
आपला वेळ देऊ, जमेल तेवढा हातभार लावू स्वतः :
सोबत इतरांचे जीवन समृद्ध करू.
तुम्ही आशादीपला अशी मदत करू शकता…
• अन्नदान योजना : रु. 90,000/-
एकरकमी देणगी दिल्यास आपल्या स्वकियांच्या स्मरणार्थ
दरवर्षी ठराविक तारखेला / तिथीला कायमस्वरूपी भोजनव्यवस्था.
• लघु अन्नदान योजना : रु. 25,000/-
आमच्या स्मरणार्थ नाश्ता / अल्पोपहाराची कायमस्वरूपी व्यवस्था केली जाईल.
आपली छोटीशी सामीलकी आम्हाला अधिक सक्षम करेल !
आ. सा. मि. सा. (आपण सारे मिळून सांभाळूया)
आपण सारे मिळून सांभाळूया या योजनेतर्गत जे गरीब कुटुंबातील मतिमंद (दिव्यांग) मुले यांना सांभाळण्याचा खर्च करू शकत नाहीत त्यासाठी समाजातील दातृत्व भावना असणाऱ्यांनी या योजनेत सामील होऊन दर महिना 100 रु. ते 300 रु. पावतीद्वारे संस्थेकडे जमा करून सहकार्य करावे.
आपल्या पश्चात काय? या प्रश्नाच्या उत्तरासाठी पालकांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या आशादीप या संघटनेला 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. 18 वर्षांपासून 60 वयोगटातील पुरुष व महिला अर्धी तीव्र मतिमंद ते सौम्य मतिमंद या गटातील 25 मुले आज आमच्या संस्थेत आहेत. घराच्या मायेनं संगोपन करणारे 11 कर्मचारी (महिला व पुरुष) समाजातील काही सामाजिक बांधिलकी जपणारे संस्थेचे हितचिंतक यामुळेच हे शक्य झाले आहे.
आता या मुलांचे केवळ संगोपन न करता त्यातील काही कार्यक्षम व्यक्ती कडून कागदी पिशव्या / फुले, मेणबत्ती, ऑफिस फाईल, आकाश कंदील, फळा, डस्टर, केरसुणी, रंगीत पणत्या अशा उत्पादनाने त्यांना स्वयंरोजगार देण्याचीही सुरूवात केलेली आहे. तेही तज्ञ कर्मचारी मंडळींच्या
सहकार्यामुळे आमच्या यशाचे हेच रहस्य आहे.
निसर्गरम्य कोकणातील शेती बागायतीसह पूरक व्यवसायातून त्यांचे पुनर्वसन करण्याचा संस्थेचा उपक्रम येणाऱ्या २ / ३ वर्षात लवकरच कार्यान्वित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. या मुलांच्या पालकांची गरज लक्षात घेता, अजून २५ मुलांच्या व्यवस्थेसाठी बांधकाम व पूरक साहित्याची गरज आहे. शासकीय धोरणामध्ये वसतिगृहासाठी कोणतीही आर्थिक तरतूद नसल्याने समाजातील दानशूर संस्था व व्यक्ती यांच्या मदतीनेच हे कार्य चालविले आहे. इच्छुक दाते आपली मदत येथे जमा करू शकतात.
आशादीपला मदत करण्यासाठी माहिती!
संस्थेचे पूर्ण नाव :- आशादीप मतिमंद मुलांचा पालक संघ, रत्नागिरी/ आशादीप मतिमंद मुलांचे स्वयंरोजगार केंद्र
नोंदणी क्रमांक नोंदणी वर्ष:-महाराष्ट्र / २३१६ / रत्ना. नोंदणी वर्ष:- २०/०७/२०००
पत्ता:-इ-67 एम.आय.डी.सी. रत्नागिरी- ४१५६३९.
ई-मेल आय डी – ashadeep.ratnagiri@gmail.com
आपण मदत/ देणगी ऑफिसला भेट देऊन अथवा बँकेच्या अकाउंट मधे ही पाठवू शकता आपण दिलेल्या रकमेची रीतसर पाऊटी दिली जाईल.
बँक अकाउंट माहिती
BANK NAME : BANK OF MAHARASHTRA | ACCOUNT NUMBER : 20174525805 | IFSC CODE : MAHAB0001215
BRANCH : KUWARBAV, RATNAGIRI. | PAN NO.- AABTA6288M.
Cheques or Drafts are accepted in favour of ASHADEEP MATIMAND MULANCHA PALAK SANGH, RATNAGIRI
“मदत करा… कारण त्यांनाही स्वप्नं आहेत.”
संस्थेशी संपर्क साधण्यासाठी
- आशादीप मतिमंद मुलांचे स्वयंरोजगार केंद्र, रत्नागिरी
- नोंदणी क्रमांक :-महाराष्ट्र / २३१६ / रत्ना. वर्ष:- २०/०७/२०००
- पत्ता:-इ-67 एम.आय.डी.सी. रत्नागिरी- ४१५६३९.
- ई-मेल आय डी – ashadeep.ratnagiri@gmail.com
- मोबाईल नंबर – ९४२२३२३४३० / ८४८४८५९४३
- कार्यालयीन वेळ : कोणतीही सुटी नसते. २४ तास सेवा चालू असते.