









आशादीप मतिमंद मुलांचे निवास व स्वयंरोजगार केंद्र, रत्नागिरी
"मतिमंद मुलांना सन्मानाने जगण्याची संधी देणे हेच आमचे ध्येय"
२५ वर्षांची सेवा, समर्पण आणि मानवतेची वाटचाल. आशादीप हे मतिमंद मुलांचे निवास व स्वयंरोजगार केंद्र असून ते मतिमंद मुलांची पालक संघटना संचलित आहे. या केंद्रामध्ये मतिमंद मुलांच्या संगोपनासोबतच त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी विविध कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाते.
आशादीप मतिमंद मुलांचे छायाचित्र व व्हिडिओ










आमचे सन्मान व पुरस्कार सेवेची दखल – समाजाचा विश्वास
गेल्या २५ वर्षांच्या सामाजिक कार्याची दखल घेत विविध संस्था, संघटना व शासनाच्या वतीने आशादीप मतिमंद मुलांचे निवास व स्वयंरोजगार केंद्र यांना तसेच आमच्या मुलांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.










आपण मदत करू शकता
संस्था विनाअनुदानित तत्त्वावर चालते, मतिमंद मुलांच्या संगोपनासाठी समाजाच्या सहकार्याची अत्यंक्त गरज आहे.
दत्तक पालक योजना - आ. सा. आपण सारे मिळून सांभाळूया
संस्थेला कोणतेही शासकीय अनुदान नाही.
मतिमंद मुलांच्या संगोपनासाठी समाजाच्या सहकार्याची अत्यंत गरज आहे.
आपण दरमहा ₹100 ते ₹300 देऊन एका मुलाच्या संगोपनासाठी योगदान देऊ शकता.
आपली छोटी मदत एखाद्या मुलाच्या जीवनात मोठा बदल घडवू शकते.
चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड, रत्नागिरी या पतसंस्थेमध्ये काही मुलांची खाती आहेत. या खात्यांमधे स्वयंरोजगारातून मिळणाऱ्या उत्पादनाची रकम मुलांच्या नावे जमा केली जाते.
👉 “आजच मदत करा – उद्याचा आशेचा प्रकाश बना.”
संस्थेशी संपर्क साधण्यासाठी
- आशादीप मतिमंद मुलांचा पालक संघ व निवासी स्वयंरोजगार केंद्र, रत्नागिरी
- नोंदणी क्रमांक :-महाराष्ट्र / २३१६ / रत्ना. वर्ष:- २०/०७/२०००
- मा. अपंग कल्याण आयुतलय समाज कल्याण पुणे ( जिल्हा – रत्नागिरी ):- B-0097
- पत्ता:-इ-67 एम.आय.डी.सी. रत्नागिरी- ४१५६३९.
- ई-मेल आय डी – ashadeep.ratnagiri@gmail.co
- मोबाईल नंबर – 7498842099 ( ऑफीस ) / 9422631417 ( रेडकर सर )
- कार्यालयीन वेळ : कोणतीही सुटी नसते. २४ तास सेवा चालू असते.