Skip to content

आशादीप मतिमंद मुलांचे निवास व स्वयंरोजगार केंद्र, रत्नागिरी

"मतिमंद मुलांना सन्मानाने जगण्याची संधी देणे हेच आमचे ध्येय"

२५ वर्षांची सेवा, समर्पण आणि मानवतेची वाटचाल. आशादीप हे मतिमंद मुलांचे निवास व स्वयंरोजगार केंद्र असून ते मतिमंद मुलांची पालक संघटना संचलित आहे. या केंद्रामध्ये मतिमंद मुलांच्या संगोपनासोबतच त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी विविध कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाते.

संस्था सुरू कशी झाली ह्याची माहिती

स्वतःचा मुलगा तीव्र मतिमंद असल्यामुळे त्यांनी हि संस्था २००० साली सुरु केली. संस्थेचे कार्य सुरु होण्यापूर्वी गेली अनेक वर्षे महाराष्ट्र आणि देशभर फिरून संस्था कश्याप्रकारे चालतात याचा अभ्यास केला. नंतर काहीवर्षापुर्वी संस्थेचे काम प्रत्यक्ष मुले सांभाळण्याचे काम सुरु करण्याचा प्रयत्न केला. पण संस्था चालू करण्यासाठी जागेचा प्रश्न व लागणारे साहित्य आणि मुख्यत्वे करून या मुलांना सांभाळण्यासाठी महिला व पुरुष कर्मचारी यासाठी प्रयत्न सुरु झालेत. परंतु आर्थिक अडचणींमुळे हे काम लवकर करू शकलो नाही. येणाऱ्या खर्चासाठी सर्व प्रथम मुलांकडून रु.१५००/- घेतले जात होते, तेवढेच रुपये कर्मचारी मानधनावरती खर्च होत होते. सुरुवातीचे २ वर्षे श्री. दिलीप रेडकर यानी स्वत:च्या खर्चातून काम सुरु केले व त्यानंतर एका माणसाने दिलेल्या छोट्या जागेत संस्थेचे कामकाज सुरु झाले.

दिनांक:-२०/०७/२००० मध्ये सार्वजनिक विश्वस्त धर्मादाय यांचेकडे आशादीप मतिमंद मुलांचा पालक संघ या संस्थेची नोदणी झाली असून मा. समाजकल्याण अपंग आयुक्तालय पुणे यांचेकडून २०/०४/२०२२ साली संस्थेला कायमस्वरूपी विनानुदानिततत्वावर मान्यता देणेत आली आहे.

संस्थेत सुरुवातीपासूनच मुलांना १ वेळ नाश्ता, २ वेळ शाकाहारी जेवण हे सर्व देताना प्रथम कर्मचारी प्रत्येक पदार्थाची चव घेऊन रजिस्टर मध्येनोंद करून सही करणे हि पद्धत सुरु ठेवण्यात आली आहे. संस्थेमध्ये राहणाऱ्या मुलांची वैद्यकीय हेळसांड होऊ नये म्हणून योग्य ती खबरदारी घेतली जाते. २-३ दिवसाचे आजारपण असेल तर संस्था याची दखल घेते व अन्यथा पुढील उपचारासाठी पालकांना कळविले जाते. त्यासाठी डॉक्टरांची टीम आमच्या पॅनलवरती आहे. ते मुलांना मोफत सेवा देतात, त्याशिवाय मुलांना वर्षातून २ वेळा टी. टी चे इंजेक्शन व जंताच्या गोळ्या दिल्या जातात.

सध्या संस्थेत २५ प्रौढ मुले वास्तव्यास असून त्यात १७ मुलगे व ८ मुली आहेत. या मुलांच्या हाताला काहीतरी काम मिळावे या उद्देशाने संस्थेने आपले छोटेसे स्वयंरोजगार केंद्र सुरु केले आहे. प्लास्टिक ला पर्याय म्हणून बऱ्याच ठिकाणी कापडी पिशव्या व कागदी पिशव्या वापरल्या जातात, तेव्हा हे एक उत्पादन मुलांना बनविणे सहज शक्य असल्याने मुलांकडून कागदी पिशव्या बनवून घेतल्या जातात. रत्नागिरीतील जवळजवळ सर्वच मेडिकल स्टोअर्समध्ये आमच्या मुलांनी बनविलेल्या पिशव्यांचा उपयोग केला जातो त्याचबरोबर कागदी फुले बनविणे, दिवाळीत पणत्या रंगविणे, उटणे बनविणे, राख्या बनविणे व थोड्या अंशी परिसरातील भाजीपाला लागवड करणे इ. गोष्टीचे प्रशिक्षण या मुलांना स्वयंरोजगार केंद्रात दिले जाते. या वस्तूंच्या विक्रीतून मिळणारे उत्पन्न थोड्याफार प्रमाणात या मुलांच्या खात्यात जमा केले जाते त्यामुळे मुलांचाही आत्मविश्वासवाढतो की आम्हीही काहीतरी करू शकतो.

संस्थेतील मुलाचे संगोपन करण्यासाठी ११ कर्मचारी कार्यरत आहे. मुलांची शारीरिक स्वच्छता करणे त्यांना भरवणे त्यांची गोळ्या औषधे वेळेवर देणे इ. सर्व कामे कर्मचारी कसलाही कंटाळा न करता करत असतात. तसेच या मुलांना घरची आठवण येऊ नये म्हणून संस्थेत सर्व सण अगदी गुण्यागोविंदाने साजरे केले जातात. 

तसेच संस्थेत रक्षाबंधनभाऊबीज हे सण साजरे करण्यासाठी इतर संस्थांमधील व्यक्ती येतात व या मुलांसमवेत राख्या बांधून त्यांचे औक्षण करून हे सण साजरे करतात. दिवाळीच्या दिवशी मुलांना तेल,उटणे लावून अघोळ घातली जाते त्यांचे औक्षण केले जाते.नवीन कपडे घालून दिवाळीच्या फराळाचा आस्वाद मुले घेतात.त्यामुळे त्यांना घरची आठवण येत नाही तसेच आवाज विरहीत फटाके फोडण्याचा आनंदही मुले घेतात.

संस्थेला शासकीय अनुदान नाही. दिवसेंदिवस वाढत जाणारी महागाई यामुळे संस्था चालविताना आर्थिक तारांबळ उडते, ही सर्व आर्थिक कोंडी थोड्याफार प्रमाणात सोडविण्यासाठी संस्थेने आ.सा.मि. सा. (आपण सारे मिळून सांभाळू या) ही दत्तक पालक योजना सुरु केली आहे. यात आपण दरमहा रु.१००/- ते रु.३००/- देऊन एका विद्यार्थ्याचा खर्च भागविण्यासाठी हातभार लावू शकता. या योजेनला समाजाचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. समाजातील अनेक दानशूर व्यक्ती व संस्था मदतीचा हात पुढे करीत आहेत. बरीचशी मंडळी आपले वाढदिवस संस्थेत येऊन साजरे करतात. दानशूर व्यक्तींच्या दातृत्वामुळेच हि संस्था चालविणे शक्य होत आहे.

मतिमंद मुलांसाठी वसतिगृह हि काळाची गरज आहे. त्या अनुषंगाने संस्थेत प्रवेशासाठी विचारणा होत आहे परंतु संस्थेची इमारत छोटी व जुनी आहे जवळजवळ १५ विद्यार्थी प्रतीक्षा यादी वर आहे. या मुलांना चांगल्या सोयी देता याव्या यासाठी संस्थेची नवी इमारत बांधण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी संस्थेकडून वेळोवेळी आर्थिक मदतीचे आवाहन केले जात असून संस्थेकडे 80जी व सी एस आर ची मान्यता आहे.

दरमहा संस्थेच्या संचालकांची सभा घेणेत येते व वर्षातून एकदा सर्वसाधारण सभा घेणेत येते. आता असलेल्या कर्मचा-यांमुळे या संस्थेचे काम उत्तम प्रकारे चालू आहे. दिवसेंदिवसमुलांची संख्या वाढत असल्यामुळे, विस्तारित इमारतीचे काम सुरु करणे हे कठीण काम काही पालकांच्या व दानशूर व्यक्तिंच्या सहकार्याने सुरु करण्यात आलेले आहे हे यामागील २५ वर्षाची यशस्वी वाटचाल आहे असे म्हणावे लागेल.

वस्तीगृह व डे-केअर सेंटर

सेरेब्रल पाल्सी, मतिमंद, वयोमानामुळे आलेले मानसिक दौर्बल्य यांसारख्या व अन्य व्याधींनी शारीरिक-दृष्ट्या अक्षम झालेल्या रुग्णांना आवश्यक सेवा पुरवण्यात येते. २४ तास संपूर्ण नर्सिंग केअर, डॉक्टरांची नियमित भेटी, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आहार, फिजिओथेरपी आदी बाबींचा सेवांमध्ये समावेश आहे.

 

वस्तीगृह व डे-केअर सेंटर

सेरेब्रल पाल्सी, मतिमंद, वयोमानामुळे आलेले मानसिक दौर्बल्य यांसारख्या व अन्य व्याधींनी शारीरिक-दृष्ट्या अक्षम झालेल्या रुग्णांना आवश्यक सेवा पुरवण्यात येते. २४ तास संपूर्ण नर्सिंग केअर, डॉक्टरांची नियमित भेटी, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आहार, फिजिओथेरपी आदी बाबींचा सेवांमध्ये समावेश आहे.

 

अपेक्षा अर्थसहाय्याची - तुम्ही आशादीपला अशी मदत करू शकता…

• आमच्या स्वयंरोजगार केंद्रात तयार झालेल्या वस्तू खरेदीकरणे.

• आपण किमान एक वर्ष एका मुलाचे पालकत्व घेऊ शकता.

• किमान एका मुलाचा एका वर्षाचा वैद्यकीय खर्च स्वतःकडे घेऊ शकता.

• स्वयंरोजगार केंद्रासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूंची खरेदी वस्तूरूपाने देऊ शकता.

• संस्थेने स्वतःच्या मालकीची वास्तू घेतलेली आहे. तिच्या विस्तार प्रकल्पासाठी आपण आर्थिक सहकार्य करू शकता.

• वसतिगृहासाठी आवश्यक वस्तूंची आपण देणगी देऊ शकता.

• मतिमंद असलेल्या गरजू व होतकरू व्यक्तींना ज्यांच्याकडे कार्यक्षमता आहे त्यांना तुम्ही रोजगार देऊ शकता.

• मतिमंद मुलांच्या पालकांना आपण संस्थेची माहिती देऊन त्यांना संस्थेच्या कार्यात सहभागी होण्यास प्रवृत्त करू शकता.

• संस्थेच्या वार्षिक अहवालासाठी दरवर्षी जाहिराती मिळवून देऊ शकता


आशादीप मतिमंद मुलांचा पालक संघ, रत्नागिरी (पदाधिकारी यादी)

अ.क्र.विश्वस्त / पदाधिकाऱ्यांची नावेपदनामफोन नंबर
ॲड श्री. विनय वसंत आंबुलकरअध्यक्ष९४२२०५६९५४
श्री. सुधीर गोपाळ साळवीउपाध्यक्ष९४२२०५०४८६
श्री. दिलीप राजाराम रेडकरसचिव९४२२६३२९१०
सौ. शामल संजय शेठसह-सचिव८३६९४६७४४४
श्री. चंद्रमोहन यशवंत देसाईखजिनदार९७६४६९६६०६
अॅड श्री. अमित चंद्रकांत ढेपसेसभासद९१६०३२५४५८
श्री. विनोद गजानन सुखटणकरसभासद९८६४६०४०८२
श्री. मुकेश सुरेश गुंदेचासभासद८४०८०३००३३
श्री. विनय वासुदेव गोखलेसभासद९४२२५४७६९८
१०सौ. वंदना विश्वनाथ पेजेसभासद९४२२८२२८६७

आपण मदत करू शकता

संस्था विनाअनुदानित तत्त्वावर चालते, मतिमंद मुलांच्या संगोपनासाठी समाजाच्या सहकार्याची अत्यंक्त गरज आहे.

दत्तक पालक योजना - आ. सा. आपण सारे मिळून सांभाळूया

संस्थेला कोणतेही शासकीय अनुदान नाही.
मतिमंद मुलांच्या संगोपनासाठी समाजाच्या सहकार्याची अत्यंत गरज आहे.

आपण दरमहा ₹100 ते ₹300 देऊन एका मुलाच्या संगोपनासाठी योगदान देऊ शकता.

आपली छोटी मदत एखाद्या मुलाच्या जीवनात मोठा बदल घडवू शकते.

चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड, रत्नागिरी या पतसंस्थेमध्ये काही मुलांची खाती आहेत. या खात्यांमधे स्वयंरोजगारातून मिळणाऱ्या उत्पादनाची रकम मुलांच्या नावे जमा केली जाते.

👉 “आजच मदत करा – उद्याचा आशेचा प्रकाश बना.”

संस्थेशी संपर्क साधण्यासाठी

  • आशादीप मतिमंद मुलांचा पालक संघ व निवासी स्वयंरोजगार केंद्र, रत्नागिरी
  • नोंदणी क्रमांक :-महाराष्ट्र / २३१६ / रत्ना. वर्ष:- २०/०७/२०००  
  • मा. अपंग कल्याण आयुतलय समाज कल्याण पुणे ( जिल्हा – रत्नागिरी ):- B-0097      
  • पत्ता:-इ-67 एम.आय.डी.सी. रत्नागिरी- ४१५६३९.                                 
  •  ई-मेल आय डी – ashadeep.ratnagiri@gmail.co
  • मोबाईल नंबर – 7498842099 ( ऑफीस ) / 9422631417 ( रेडकर सर )
  • कार्यालयीन वेळ : कोणतीही सुटी नसते. २४ तास सेवा चालू असते.