Skip to content

आशादीप मतिमंद मुलांचा पालक संघ व निवासी स्वयंरोजगार केंद्र, रत्नागिरी

"मतिमंद मुलांना सन्मानाने जगण्याची संधी देणे हेच आमचे ध्येय"

२५ वर्षांची सेवा, समर्पण आणि मानवतेची वाटचाल. आशादीप हे मतिमंद मुलांचे निवास व स्वयंरोजगार केंद्र असून ते मतिमंद मुलांची पालक संघटना संचलित आहे. या केंद्रामध्ये मतिमंद मुलांच्या संगोपनासोबतच त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी विविध कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाते.

संस्थेबद्दल थोडक्यात माहिती

मा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार श्री. दिलीप राजाराम रेडकर यांनी आपल्या प्रयत्नातून कार्यरत असलेल्या आशादीप मतिमंद मुलांच्या संस्थेतून २००० साली सगळ्या पालकांना एकत्र घेऊन “आशादीप” ही संस्था सुरू केली.

आज संस्थेत २५ मुले (मुले/मुली) वास्तव्यास असून त्यांना निवास, भोजन, आरोग्यसेवा आणि कागदी पिशव्या, कागदी फुले, केरसुनी, सणानुसार पणत्या  रंगविणे, राख्या बनविणे इ. प्रकारचे या मुलांना स्वावलंबी बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाते.

या मुलांच्या हाताला काहीतरी काम मिळावे या उद्देशाने संस्थेने आपले छोटेसे स्वयंरोजगार केंद्र सुरु केले आहे. रत्नागिरीतील जवळजवळ सर्वच मेडिकल स्टोअर्समध्ये आमच्या मुलांनी बनविलेल्या कागदी पिशव्यांचा उपयोग केला जातो व थोड्या अंशी परिसरातील भाजीपाला लागवड (शेवगाच्या शेंगा, केळ  फूल) तसेच फळांचे उत्पादन (आंबा, चिकू, केळी, काजू, पपनस, पेरू, रामफळ, जांभुळ ) इ. गोष्टीचे प्रशिक्षण या मुलांना स्वयंरोजगार केंद्रात दिले जाते.

समाजातील दानशूर व्यक्ती व तुटपुंज्या मानधनावर काम करणारे कर्मचारी यांच्या मदतीने संस्थेचा कारभार व मुलांचे उत्तमरीत्या संगोपन करतात याची दखल घेऊन आमच्या संस्थेला कोकण भूषण पुरस्कार २०१६ प्राप्त झाला आहे.२००० साली लावलेले हे छोटेसे रोपटे आता बहरत आहे.

आमचे ध्येय

"मतिमंद मुलांना सुरक्षित, सन्मानपूर्ण व स्वावलंबी जीवन देणे"

आमचे उद्दिष्टे

  • मतिमंद मुलांचे संगोपन व संरक्षण
  • शिक्षण व कौशल्य विकास

 

  • स्वयंरोजगाराच्या संधी
  • समाजात समानतेची भावना निर्माण करणे

आमचे कार्य

निवास व भोजन व्यवथा

वैद्यकीय सेवा आणि उपचार

स्वयंरोजगार प्रशिक्षण

सण व उत्सव साजरे करणे

प्रशिक्षित कर्मचारी सेवा

दत्तक पालक योजना

आमचे स्वयंरोजगार केंद्र

मतिमंद मुलांना स्वावलंबी बनविण्याच्या उद्दिष्टाने संस्थेचे स्वयंरोजगार केंद्र सुरू केले आहे. येते मुलांना खालील कामांचे प्रशिक्षण दिले जाते

कागदी पिशव्या बनविणे

कागदी फुले तयार करणे

दिवाळी पणत्या रंगवणे

राख्या बनवणे

उटणे तयार करणे

फळांची लागवड

या उत्पादनांच्या विक्रीतून मिळणारे उत्पन्न मुलांच्या खात्यात जमा केले जाते, ज्यामुळे त्यांच्या आत्मविश्वास वाढतो.

आमचे सन्मान व पुरस्कार सेवेची दखल – समाजाचा विश्वास

गेल्या २५ वर्षांच्या सामाजिक कार्याची दखल घेत विविध संस्था, संघटना व शासनाच्या वतीने आशादीप मतिमंद मुलांचे निवास व स्वयंरोजगार केंद्र यांना तसेच आमच्या मुलांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

आपण मदत करू शकता

संस्था विनाअनुदानित तत्त्वावर चालते, मतिमंद मुलांच्या संगोपनासाठी समाजाच्या सहकार्याची अत्यंक्त गरज आहे.

दत्तक पालक योजना - आ. सा. आपण सारे मिळून सांभाळूया

संस्थेला कोणतेही शासकीय अनुदान नाही.
मतिमंद मुलांच्या संगोपनासाठी समाजाच्या सहकार्याची अत्यंत गरज आहे.

आपण दरमहा ₹100 ते ₹300 देऊन एका मुलाच्या संगोपनासाठी योगदान देऊ शकता.

आपली छोटी मदत एखाद्या मुलाच्या जीवनात मोठा बदल घडवू शकते.

चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड, रत्नागिरी या पतसंस्थेमध्ये काही मुलांची खाती आहेत. या खात्यांमधे स्वयंरोजगारातून मिळणाऱ्या उत्पादनाची रकम मुलांच्या नावे जमा केली जाते.

👉 “आजच मदत करा – उद्याचा आशेचा प्रकाश बना.”

संस्थेशी संपर्क साधण्यासाठी

  • आशादीप मतिमंद मुलांचा पालक संघ व निवासी स्वयंरोजगार केंद्र, रत्नागिरी
  • नोंदणी क्रमांक :-महाराष्ट्र / २३१६ / रत्ना. वर्ष:- २०/०७/२०००  
  • मा. अपंग कल्याण आयुतलय समाज कल्याण पुणे ( जिल्हा – रत्नागिरी ):- B-0097      
  • पत्ता:-इ-67 एम.आय.डी.सी. रत्नागिरी- ४१५६३९.                                 
  •  ई-मेल आय डी – ashadeep.ratnagiri@gmail.co
  • मोबाईल नंबर – 7498842099 ( ऑफीस ) / 9422631417 ( रेडकर सर )
  • कार्यालयीन वेळ : कोणतीही सुटी नसते. २४ तास सेवा चालू असते.